जेलमध्येच थरार! दोन कैद्यांना मारल्यानंतर एन्काउंटरमध्ये गँगस्टरचाही खात्मा

जेलमध्येच थरार! दोन कैद्यांना मारल्यानंतर एन्काउंटरमध्ये गँगस्टरचाही खात्मा

चित्रकूट (उत्तर प्रदेश) : चित्रकूट मध्यवर्ती कारागृह (Chitrakoot jail) शुक्रवारी सकाळी गोळीबाराच्या आवाजाने हादरले.(3 gangsters shot dead) कैद्यांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात एका कैद्याने इतर दोन बंदींचा खून केला. तुरुंगाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात खुनी कैद्याला ठार केले. रगौली तुरुंगाचे जेलर एस. पी. त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली. तुरुंगातील काही कैद्यांमध्ये आपापसांत झटापट झाली. सीतापूरचा शार्प शूटर अंशुल दीक्षितने वसीम काला आणि मीराजुद्दीन यांच्यावर बंदुकीतून बेछूट गोळीबार केला. (Anshul Dixit shot dead Mukeem Kala and Mirajudeen)सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत अंशुलने दोघांवर गोळ्‍यांचा अक्षरशः वर्षाव केला.

जेलमध्येच थरार! दोन कैद्यांना मारल्यानंतर एन्काउंटरमध्ये गँगस्टरचाही खात्मा
हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल

यात वसीम आणि मीराजुद्दीन जागीच ठार झाले. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अंशुलला आव्हान करीत आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण त्याने त्यांच्यावरही गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिक्षक आदी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुरुंगाला भेट दिली. तासाभरात अनेक पोलिस स्थानकांतील पोलिसांच्या फौजाही तुरुंगात पोचल्या.

जेलमध्येच थरार! दोन कैद्यांना मारल्यानंतर एन्काउंटरमध्ये गँगस्टरचाही खात्मा
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी केजरीवालांची मोठी घोषणा

कैद्यांमधील झटापट सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडील बंदूक हिसकावून अंशुलने दोघांवर गोळीबार केला, असे त्रिपाठी यांनी सांगितले. शार्प शूटर अंशुलला गोरखनाथ जिल्ह्यातून २०१४मध्ये अटक झाली होती. पश्‍चिम उत्तर प्रदेशमधील गुंड वसीम काला याला सहारनपूर तुरुंगातून आणि पूर्वांचलमधील मुख्तार टोळीतील गुंड मीराजुद्दिन याला बनारसहून चित्रकूट तुरुंगात आणले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com