UPSC मध्ये नागपुरातील तिघांची बाजी, निकालाचा टक्काही वाढला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC Civil Service final result nagpurs Sumit Ramteke ranked 358

UPSC मध्ये नागपुरातील तिघांची बाजी, निकालाचा टक्काही वाढला

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ३०) जाहीर करण्यात आला. यामध्ये उपराजधानीतीन तिघांनी बाजी मारली आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये शुभम भैसारे याला ९७, सुमित रामटेकेला ३५८ तर शुभम नगराले याला ५६८ वा रॅंक मिळाला आहे. विशेष म्हणजे उपराजधानीच्या निकालाचा टक्काही वाढला आहे.

गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (युपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुख्य मुलाखत फेरी २ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२१ यादरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या वर्षी मुलाखतीची प्रक्रिया २६ मे २०२२ रोजी संपली. त्यात नागपूरमधील सहा उमेदवारांचा समावेश होता.

दरम्यान युपीएससी सीएसई- २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानुसार निकालाची घोषणा झाली. त्यात सहापैकी तीन उमेदवारांनी बाजी मारली आहे. यामध्ये शुभम भैसारे याला ९७, सुमित रामटेकेला ३५८ तर शुभम नगराले याला ५६८ वा रॅंक मिळाला आहे. आतापर्यंत इतक्या प्रमाणात उपराधानीतील विद्यार्थ्यांना कधीही यश मिळाले नव्हते. विशेष म्हणजे ९७ वा रॅक आतापर्यंतचा सर्वाधिक रॅंक असल्याचे समजते. यापैकी सुमित सध्या केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात कार्यरत आहे. आता या रॅंकने त्याचा आयएएस होण्याचा मार्ग सोपा होणार आहे.

Web Title: Upsc Civil Service Final Result Nagpurs Sumit Ramteke Ranked

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top