Anuj Agnihotri UPSC topper
esakal
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२६ चा अंतिम निकाल शुक्रवारी (ता. ६ मार्च) जाहीर केला. या परीक्षेत राजस्थानमधील चित्तोडगड जिल्ह्यातील रावतभाटा येथील अनुज अग्निहोत्री यांनी (UPSC CSE 2026 Topper) देशात पहिला क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करत अव्वल स्थान पटकावले.