

Artificial Intelligence
sakal
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आता परीक्षांमधील हेराफेरी आणि बनावट उमेदवारांची ओळख पटविण्यासाठी ‘एआय’वर आधारित चेहरा पडताळणी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यासाठीच्या पायलट प्रोग्रॅमची नुकतीच यशस्वी चाचणी घेण्यात आल्याची माहिती ‘यूपीएससी’चे अध्यक्ष अजयकुमार यांनी दिले. नॅशनल ई- गव्हर्नन्सशी भागीदारी करून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.