

UPTET 2026
esakal
उत्तर प्रदेश शिक्षण सेवा निवड आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली 'उत्तर प्रदेश शिक्षक पात्रता परीक्षा' (UPTET) २०२६ अत्यंत शांततेत आणि पारदर्शक वातावरणात सुरू झाली आहे. मात्र, या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करून दुसऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या १५ बोगस परीक्षार्थ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या सर्व आरोपींना तातडीने स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या परीक्षेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच संपूर्ण परीक्षा केंद्रांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेचा वापर करून देखरेख ठेवली जात आहे.