US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

tariff news India : जाणून घ्या, मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी नेमकी काय दिली आहे माहिती?
US may lift the additional 25 percent tariff on Indian goods, boosting bilateral trade relations.

US may lift the additional 25 percent tariff on Indian goods, boosting bilateral trade relations.

esakal

Updated on

US may lift the additional 25 Percent tariff on Indian goods : भारतावर अन्याकारक पद्धतीने जादार टॅरिफ लादल्यांतर आता अमेरिकेला आपल्या चुकीचे हळूहळू उपरती होताना दिसत आहे. जगभरातील बलाढ्य देशांना या मुद्य्यावर भारताची बाजू घेतली होती. शिवाय, भारतानेही अमेरिकेसमोर न झुकता आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर मग अमेरिकेची म्हणजे ट्रम्प यांची भारताबद्दलची भूमिका मवाळ होवू लागल्याचे दिसून आले.

याच पार्श्वभूमीवर आता अशीही माहिती समोर येत आहे की, अमेरिका भारतावर लादलेल्या ५० टक्के टॅरिफमध्ये मोठा दिलासादायक निर्णय घेऊ शकते आणि रशियन तेल खरेदीबाबत ट्रम्प यांनी लावलेला २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ हटवला जाऊ शकतो.

 मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिका लवकरच भारतीय वस्तूंवरील अतिरिक्त टॅरिफ हटवू शकते आणि रेसिप्रोकल टॅरिफमध्येही घट करून तो १० ते १५ टक्के केला जाऊ शकतो. याचबरोबर नागेश्वरन यांनी भारत-अमेरिका ट्रेड डील पुढे जाण्याचेही संकेत दिले आहेत.

US may lift the additional 25 percent tariff on Indian goods, boosting bilateral trade relations.
Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

कोलकातामध्ये एका कार्यक्रमात बोलताना नागेश्वरन यांनी म्हटले की, त्यांना टॅरिफच्या मुद्य्यावर आगामी आठ ते दहा आठवड्यात तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. त्यांनी म्हटले की, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी काही महिन्यात कमीत कमी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफबाबत नक्कीच तोडगा निघेल.

US may lift the additional 25 percent tariff on Indian goods, boosting bilateral trade relations.
Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

तर बिझनेस टुडेमधील रिपोर्टनुसार नागेश्वरन यांनी पुढे म्हटले की दोन्ही देशांमध्ये व्यापर कराराबाबत चर्चेला गती येण्याचे संकेत मिळत आहेत. ज्यामुळे जवळपास ५० अब्ज डॉलर किंमतीच्या भारतीय निर्यातीवरील दबाव कमी होवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com