Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी रात्री अमेरिकेने इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हवाई हल्ले केल्याचा दावा केलाय. या कारवाईनंतर आखाती देशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक मुस्लिम देश (Muslim Countries) इराणच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाच्या शक्यतेची चर्चा जोर धरू लागली आहे.