esakal | अमेरिकेचा आपल्या नागरिकांना भारत सोडण्याचा सल्ला; लेवल-४ ट्रॅव्हल अलर्ट जाहीर

बोलून बातमी शोधा

phone call about bomb on Nashik Hyderabad flight investigation revealed shocking information Marathi news

अमेरिकेचा आपल्या नागरिकांना भारत सोडण्याचा सल्ला; लेवल-४ ट्रॅव्हल अलर्ट जाहीर

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन : भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताचा लेवल -४ ट्रॅव्हल अॅडव्हायजरीमध्ये समावेश केला आहे. या अलर्टनुसार, अमेरिकेनं लोकांना भारताकडे प्रवास करु नये तसेच जे अमेरिकनं लोक सध्या भारतात आहेत त्यांनी लवकरात लवकर भारत सोडावा असं आवाहन केलं आहे. कारण, भारतात सध्या मर्यादित वैद्यकीय सेवा-सुविधा उरल्या आहेत.

अमेरिकेनं आज भारतासाठी अत्यावश्यक आरोग्य सुविधांची पहिली खेप रवाना केली आहे. ट्राविस एअर फोर्स बेस येथून जगातील सर्वात मोठ्या मिलिटरी विमानातून ४४० ऑक्सिजन सिलिंडर्स आणि रेग्युलेटर्स हे कॅलिफोर्निया राज्याकडून पाठवण्यात आले आहेत. दिल्लीच्या विमानतळावर हे विमान पोहोचणार आहे. युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं (USAID) सांगितलं आहे.

कॅलिफोर्निया राज्यानं पहिल्या विमानातून USAID नं ९,६०,००० रॅपिड डायग्नोस्टिक्स टेस्ट कीट पाठवलेल्या आहेत. याद्वारे लवकरात लवकर इन्फेक्शनची माहिती मिळू शकते. यामुळे मोठ्या प्रमाणावर संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये भारताच्या फ्रन्टलाईन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १,००,००० N95 मास्कही आहेत.

USAID नं कोरोना महामारी सुरु झाल्यापासून २३ मिलियन डॉलर्सची मदतही पाठवली आहे. ही मदत सुमारे १० मिलियन भारतीयांपर्यंत पोहोचलीही आहे. त्याचबरोबर आता १,००० मेडिकल ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर खरेदी करण्यात येणार आहेत. जे भारतातील ३२० प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.