

Donald Trump faces political challenges following the Democratic Party's victory in the US midterm elections.
esakal
वॉशिंग्टन, : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीतील निकालानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पकड ढिली होणार आहे. विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाला दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळाल्यामुळे, ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणावरही मर्यादा येणार आहे. त्यामुळे आयात शुल्कापासून एच१बी व्हिसापर्यंतच्या धोरणांमध्ये सातत्याने होणाऱ्या आमूलाग्र बदलांऐवजी आता पूर्वानुमान बांधता येईल, असे अमेरिकेचे धोरण असू शकते आणि ही गोष्ट भारतासह जगासाठी दिलासा देणारी ठरणार आहे.