ट्रम्प यांना अन्य देशात युद्धासाठी अमेरिकन सैनिकांना धाडायचे नाही. पण, आज जगातील तब्बल 80 देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळावरून ते सैनिकांना माघारी येण्यास सांगणार काय?
US President Donald Trump and India : अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा 20 जानेवारी 2025 रोजी शपथविधी झाला, त्या दिवसापासून त्यांनी एकामागून एक अध्यादेश जारी करण्याचा सपाटा लावलाय. अमेरिकेच्या अंतर्गत व जागतिक पातळीवर त्याचे परिणाम दिसू लागलेत.