esakal | मोदी माझे मित्र, भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक : ट्रम्प

बोलून बातमी शोधा

Donald Trump

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राजधानी दिल्लीप्रमाणेच मोदींचे होमग्राऊंड असणारे गुजरातदेखील या महासत्ताधीशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

मोदी माझे मित्र, भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक : ट्रम्प
sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत आणि भारतातील मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना राजधानी दिल्लीप्रमाणेच मोदींचे होमग्राऊंड असणारे गुजरातदेखील या महासत्ताधीशाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह अमेरिकी प्रशासनातील अनेक बडे अधिकारी असतील. 
ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित आहे. ट्रम्प हे तब्बल 36 तास भारतामध्ये असतील. 

आज (सोमवार) पहाटे चारच्या सुमारास ट्रम्प हे जर्मनीहून निघाले त्यावेळी त्यांनी भारतीयांना संदेश दिला आहे. आज सकाळी बाराच्या सुमारास ते अहमदाबादमध्ये दाखल होणार आहेत. ट्रम्प म्हणाले, की भारतातील नागरिकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही लाखो नागरिकांना भेटणार आहोत. पंतप्रधान मोदींचीच सोबत मला चांगली वाटते आणि ते माझे चांगले मित्र आहेत. भारत दौऱा हा माझ्यासाठी सर्वांत मोठा इव्हेंट असेल.