esakal | साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प यांनी गांधींचे नाव न लिहिता 'हे' लिहिले
sakal

बोलून बातमी शोधा

Donald Trump

ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात दाखल होताच आश्रमाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेलानियासह चरखाही चालविला. मोदींनीही याबाबत त्यांना माहिती दिली. साबरमती आश्रमात काही मिनिटे घालविल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये त्यांनी अभिप्राय लिहिला. या अभिप्रायामध्ये ट्रम्प यांनी महात्मा गांधींचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

साबरमती आश्रमात जाऊन ट्रम्प यांनी गांधींचे नाव न लिहिता 'हे' लिहिले

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अहमदाबाद : भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या साबरमती आश्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्नी मेलानियासह भेट दिली. यावेळी त्यांनी व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेल्या अभिप्रायामध्ये महात्मा गांधींचे नाव न घेतल्याचे समोर आले आहे.

ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात दाखल होताच आश्रमाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मेलानियासह चरखाही चालविला. मोदींनीही याबाबत त्यांना माहिती दिली. साबरमती आश्रमात काही मिनिटे घालविल्यानंतर व्हिजिटर बुकमध्ये त्यांनी अभिप्राय लिहिला. या अभिप्रायामध्ये ट्रम्प यांनी महात्मा गांधींचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.

ट्रम्प यांनी अभिप्रायात लिहिले आहे, की माझे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या भेटीबद्दल मी विशेष आभार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांना चरखा फिरविण्याचाही मोह आवरला नाही.

ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह अमेरिकी प्रशासनातील अनेक बडे अधिकारी भारतात दाखल झाले आहेत. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित असून, अर्थकारणाच्यादृष्टीने कळीचा विषय असणारा आयातशुल्काचा मुद्दा मात्र तसा अधांतरी राहू शकतो. ट्रम्प हे तब्बल 36 तास भारतामध्ये असतील. मोदी आणि ट्रम्प यांच्यात मंगळवारी चर्चा होणार असून, यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण- सुरक्षितता, दहशतवादविरोधी रणनीती, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा तालिबान्यांसोबतचा प्रस्तावित शांती करार आणि आशिया प्रशांतमधील स्थिती आदी मुद्दे केंद्रस्थानी असतील.  

loading image