जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये ड्रोनचा वापर, वाहतुकीवर बंदी!

जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर निर्बंध लागू
Drone
Drone

श्रीनगर : जम्मूच्या एअरफोर्स स्टेशनमध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर आता राज्य आणि सैन्य प्रशासन सतर्क झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आता श्रीनगर शहरात ड्रोनच्या सर्व प्रकारच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे ड्रोन बाळगणे आणि त्याची वाहतूकही करता येणार नाही, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

Drone
मेहुल चोक्सीची जामिनासाठी पुन्हा डॉमिनिकाच्या हायकोर्टात धाव

त्यामुळे आता श्रीनगर जिल्ह्यामध्ये जर कोणाकडे पहिल्यापासूनच ड्रोन कॅमेरे असतील किंवा मानवरहित इतर कोणत्याही प्रकारची हवाई उपकरणं असतील तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये द्यावी लागणार आहे. यापूर्वी कठुओ जिल्ह्यात विवाह समारंभ किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात ड्रोन वापरासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम १४४ लागू करत ड्रोन आणि इतर उडणाऱ्या खेळण्यांवरही निर्बंध लागू केले आहेत.

Drone
सायनाच्या राजकीय ट्विटवर तिखट 'ड्रॉप शॉट'

महत्वपूर्ण संस्थांची सुरक्षा लक्षात घेता कठुआच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आदेश देत ड्रोनच्या वापराचा नियंत्रित घडामोडींमध्ये समावेश केला आहे. या आदेशांनुसार, कठुआ जिल्ह्यात ड्रोन ऑपरेशनसाठी आता एसीआर किंवा एसडीएमची परवानगी घेणं अनिवार्य असेल. ज्याद्वारे विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येईल तसेच याचं संपूर्ण रेकॉर्ड ठेवलं जाईल.

Drone
झोमॅटोच्या IPOला मंजुरी; गुंतवणूकीआधी जाणून घ्या 'या' गोष्टी

ड्रोन ऑपरेटर्सना आता ड्रोन उडवताना त्यावर थेट नजर ठेवावी लागणार आहे. तसेच हे ड्रोन नजरेआड होणार नाहीत याची देखील त्यांना काळजी घ्यावी लागेल. तसेच कोणत्याही ड्रोनला चारशे मीटरपेक्षा अधिक उंचीवर उडवण्याची परवानगी नसेल. विशेषतः संध्याकाळ झाल्यानंतर आपत्कालिन स्थितीशिवाय ड्रोन उडवता येणार नाही. त्यामुळे याचा थेट परिणाम रात्री लग्न समारंभांवर होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com