अमेरिकेची फर्स्ट लेडी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प असून, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स (जेम्स डेव्हिड व्हान्स) यांची पत्नी उषा व्हान्स, होत. त्या मूळचे भारतीय नाव उषा चिलुकुरी आहे. मेलानिया अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासह दिसतात. तितक्या वारंवार उषा व्हान्स दिसत नाहीत. बराच वेळ त्या वॉशिंग्टनमधील उपराष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानी घरातील कामकाज व आपल्या तीन मुलांबरोबर घालवितात. आजवर अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांनी त्यांची मुलाखत घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु त्यांनी मुलाखतीस नकार दिलाय.