esakal | लोकसभा 2024च्या तोंडावर राम मंदिराचा गाभारा होणारा दर्शनासाठी खुला
sakal

बोलून बातमी शोधा

लोकसभा 2024च्या तोंडावर राम मंदिराचा गाभारा होणारा दर्शनासाठी खुला

लोकसभा 2024च्या तोंडावर राम मंदिराचा गाभारा होणारा दर्शनासाठी खुला

sakal_logo
By
विनायक होगाडे

अयोध्या : 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राम मंदिराचा मुद्दा निश्चितपणे ऐरणीवर आणण्याच्या तयारीत आहे. सध्या राम मंदिराचं बांधकाम गतीने सुरु आहे. राम मंदिराच्या गाभाऱ्याचं बांधकाम 2023 पर्यंत पूर्ण व्हावं यासाठी सध्या युद्धपातळीवर काम सुरु आहे. पूर्ण बांधकाम व्हायच्या आधीच या गाभाऱ्यामध्ये राम लल्ला, सीता आणि लक्ष्मण यांच्या मुर्त्या 2023 मध्ये स्थापन करण्याचा भाजपचा मानस आहे. आणि त्यानंतर मंदिराचं उर्वरित बांधकाम पूर्ण केलं जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने आधीच देशातील तसेच जगभरातील भाविकांना दर्शणासाठी गाभारा खुला करण्यात येणार आहे. जेणेकरुन गेली कित्येक वर्षे ज्या मुद्यांवर राजकारण करत भाजप देशाच्या सत्तेवर पोहोचला ते वचन पूर्ण केलेलं लोकांना पहायला मिळेल. आणि 2024 च्या लोकसभेमध्ये पुन्हा त्याचा फायदा पक्षाला व्हावा, असा हेतू दिसून येतो आहे. एकूण मंदिराचं बांधकाम 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट

राम मंदिर ट्रस्टच्या अयोध्येत झालेल्या बैठकीमध्ये हे निश्चित करण्यात आले आहे. 2025 साल पूर्ण होऊ पर्यंत 70 एकर जमिनीवरील राम जन्मभूमीचा परिसर पूर्णपणे विकसित केला जाईल.

2025 मध्ये राम मंदिर पूर्णपणे होणार तयार - चंपत राय

राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी म्हटंलय की, 2025 मध्ये राम मंदिर पूर्णपणे तयार होईल. हा सर्व परिसर सुरक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वपूर्ण आहे. 2023 पर्यंत आम्ही भाविकांसाठी दर्शन सुरु करुन टाकणार आहोत. 2025 साल संपूपर्यंत 70 एकरचा परिसर पूर्णपणे विकसित झालेला असेल.

loading image