esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत भेट

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली आहे. ते जवळपास 1 तासाहून अधिक काळ या बैठकीत होते. शरद पवार यांनी याआधी पियुष गोयल यांच्याशी भेट घेतली. त्यानंतर ते राजनाथ सिंह यांनाही भेटले होते. आणि आता ही नरेंद्र मोदींची भेट त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा: 'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात

महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात पहिल्या टर्ममध्ये सातत्याने भेटी व्हायच्या. मात्र, दुसऱ्या टर्ममध्ये भेटी कमी झाल्या होत्या. आता ही मोठ्या कालावधीनंतर झालेली भेट आहे. याआधी जूनमध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट झाली होती. त्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची भेट झालीय. काल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

loading image