UP Crime News : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील दातागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बिरामपूर गावात जमिनीच्या वादातून आई आणि मुलीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. इतकेच नाही, तर घराबाहेर झोपलेल्या मुलालाही हल्लेखोराने जखमी केले.