उत्तर प्रदेश : संकल्प भागिदारी मोर्चात भीम आर्मी

भीम आर्मी लवकरच भागिदारी संकल्प मोर्चात सहभागी होईल असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी केला.
भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) प्रमुख ओमप्रकाश राजभर
भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) प्रमुख ओमप्रकाश राजभरsakal

बलिया : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूकीसाठी चंद्रशेखर आझाद यांची भीम आर्मी लवकरच भागिदारी संकल्प मोर्चात सहभागी होईल असा दावा सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा) प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी केला.

राजभर याआधी भाजपबरोबर होते. नंतर सत्ताधारी पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी समविचारी छोट्या पक्षांची मोट बांधली आहे. याविषयीची अधिकृत घोषणा २७ ऑक्टोबर रोजी सभेत होईल, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मजलिस-ए-इत्तेहादूलचे (एमआयएम) असदुद्दीन ओवेसी आणि आझाद यांची मी मंगळवारी लखनौमध्ये भेट घेतली. ती अत्यंत फलदायी ठरली. आम्ही निवडणुकीची रणनीती ठरविली. भीम आर्मी प्रमुखांनी आम्हाला साथ देण्यास होकार दर्शविला आहे.

तेल्हारा : पतीच्या अपघाताचा बहाणा करून विवाहितेवर अत्याचार

२७ तारखेची सभा महू येथील हलधरपूर येथे होईल. संकल्प भागीदारी मोर्चाची ही पहिली भव्य प्रचारसभा असेल. भीम आर्मीची स्थापना २०१४ मध्ये झाली. दलितांच्या हक्कांसाठी लढ्याचे त्यांचे ध्येय आहे. आझाद यांनी त्यानंतर गेल्या वर्षी मार्चमध्ये आझाद समाज पार्टीची स्थापना केली. बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी त्यांनी पप्पू यादव यांच्या नेतृत्वाखालील जनअधिकार पार्टीसह युती केली होती. विकासशील इन्सान पार्टी मोर्चात सहभागी होणार का, या प्रश्नावर राजभर यांनी सांगितले की, या पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे कॅबिनेट मंत्री मुकेश सहानी यांनी १५ ऑक्टोबर रोजी निर्णयाची माहिती देऊ असे कळविले आहे.

संकल्प भागिदारी मोर्चाचा सभांवर भर

संकल्प भागिदारी मोर्चाने सभांचे नियोजन केले आहे. कानपूर, मुरादाबाद आणि बस्ती येथे सभा होणार आहेत. त्यात ओवेसी आणि आझाद यांच्यासह संकल्प भागीदारी मोर्चाचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. एमआयएमने शंभर जागा लढविण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com