बलरामपूर (उत्तर प्रदेश) : कथित धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा (Changur Baba) याच्या आलिशान हवेलीवर तिसऱ्या दिवशीही बुलडोझरची कारवाई सुरू आहे. उत्तरौला तालुक्यातील माधपूर गावात ही कारवाई प्रशासनाकडून केली जात आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता ८ जेसीबी (JCB) यंत्रांसह अधिकाऱ्यांचे पथक हवेलीवर दाखल झाले.