esakal | कोविडची सौम्य लक्षणं असल्यास आधी एक्स-रे काढा, सीटी स्कॅन टाळा - एम्स
sakal

बोलून बातमी शोधा

Randeep Guleria

कोविडची सौम्य लक्षणं असल्यास आधी एक्स-रे काढा, सीटी स्कॅन टाळा - एम्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : सौम्य लक्षणं असलेल्या कोविड रुग्णांनी आधी एक्स-रे काढावा, सीटी स्कॅन टाळावा. असा सल्ला एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. त्याचबरोबर जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा खाली गेलेली असेल त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल व्हायला हवं, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: तीन दिवसांत राज्यांना मिळणार ५८ लाखांहून अधिक लसींचे डोस - केंद्र सरकार

पत्रकार परिषदेत बोलताना गुलेरिया म्हणाले, "कोविडवर अनेक अभ्यास झाले आहेत यामध्ये असं दिसून आलंय की, ३० ते ४० टक्के लोकांमध्ये लक्षणं नाहीत. पण ते कोविड पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी सीटी स्कॅनही करुन घेतलं आहे. त्यांच्या सीटी स्कॅनमध्ये काही पॅचेस दिसून येतात ते कोणत्याही उपचारांशिवाय नाहीसे होतात"

हेही वाचा: पत्रकारही असतील कोविड वॉरियर्स; ममता बॅनर्जींची घोषणा

गुलेरिया पुढे म्हणाले, "एक सीटी स्कॅन ३०० ते ४०० छातीच्या एक्स-रे समान आहे. सीटी स्कॅन केल्यानं नंतर कॅन्सरचा धोकाही संभावतो. विशेषतः तरुणांना याचा धोका होऊ शकतो, कारण त्यांच्या शरीरात धोकादायक रेडिएशनचा परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला कोविडचा संसर्ग झाल्याचा संशय असेल तर पहिल्यांदा तुम्ही एक्स-रे काढण्यासाठी जा आणि एक्स-रे डॉक्टरांना दाखवा ते तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि सांगतील की त्यांना सीटी स्कॅनची गरज आहे की नाही."

हेही वाचा: लढा कोरोनाशी! टाटा ग्रुप करणार 2 हजार कोटींचा खर्च

दरम्यान, बायोमार्कर्सवर बोलताना गुलेरिया म्हणाले, "जर एखादी व्यक्ती सौम्य लक्षणांसह कोविड पॉझिटिव्ह असेल तर त्याला रक्ताची चाचणी, सीपीसी किंवा एलडीएच करण्याची गरज नाही. या चाचण्या फक्त तुमची भीती वाढवण्याचं काम करतील. हे बायोमेकर्स शरीरात तीव्र उष्णता निर्माण करतात ज्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बायोमेकर्स हे जास्त धोकादायक आहेत."

स्टेरॉईडमुळं न्यूमोनियाचा धोका

कोविडच्या सुरुवातीच्या लक्षणांवेळीच जर शरीरात मोठ्या प्रमाणावर स्टेरॉईड घेतलं गेलं तर यामुळे न्यूमोनियाचा मोठा धोका असतो. जो तुमच्या फुफ्फुसांमध्ये पसरू शकतो. सौम्य लक्षणं असलेल्या व्यक्तीवर साधारण औषधांनीच उपचार व्हायला हवेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर स्टेरॉईड देण्यात येऊ नयेत. स्टेरॉईड केवळ जास्त आणि गंभीर इन्फेक्शन झाल्यासच घेतलं जावं, असंही गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

loading image
go to top