
Uttar Pradesh
sakal prime deals
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल (रविवारी) अयोध्येत दीपोत्सव सोहळ्याचे उद्घाटन केले. राम मंदिर चळवळीदरम्यान विरोधी पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवर हल्लाबोल केला. जिथे पूर्वी गोळ्या झाडल्या जात होत्या तिथे आता दिवे लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘याच अयोध्येत रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान काँग्रेसने राम हे एक मिथक असल्याचे म्हटले होते, तर समाजवादी पक्षाने रामभक्तांवर गोळ्या झाडल्या. आज उत्तर प्रदेशला ओळखीच्या संकटाचा सामना करावा लागत नाही,जगभरात आज अयोध्येचा डंका सुरू आहे. असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.