
Uttar Pradesh
sakal prime
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात अनेक समस्यांचा लोकांना सामना करावा लागत असतो. काही लोक तक्रार करायला जातात मात्र त्यांना कोणी दाद देत नाही. अशावेळी लोक कोणी ओळखीचा भेटतो का हे पाहतात. पण आता लोकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण, कुठल्याही कार्यालयातील अधिकारी दाद देत नसतील तर थेट मुख्यमंत्रीच त्यांच्या मदतीला येणार आहेत.