
उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना समोर घडली आहे. इथे लग्नाच्या एका महिन्यानंतर, बेगम तिच्या दिरासोबत घरातून पळून गेली. मौलाना पतीचा एकच दोष होता की त्याने पत्नीच्या विनंतीला न जुमानता दाढी करण्यास नकार दिला. पीडितेने बुधवारी लिसाडी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्या पत्नीला परत मिळवून देण्याची मागणी केली आहे.