
Yogi Government issues a new order in Uttar Pradesh introducing life imprisonment law even for dogs, sparking state-wide debate.
esakal
Yogi Governments New Order in Uttar Pradesh : भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मागील काही दिवसांत प्रचंड चर्चेत आला आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अशा भटक्या कुत्र्यांबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. आता जर भटके कुत्रे रस्त्यावर एखाद्यावर हल्ला करून दोनदा चावले तर त्यांना अक्षरशा जन्मठेपेची शिक्षा असणार आहे. जरी ही शिक्षा माणसांना गंभीर आणि मोठ्या गुन्ह्यासाठी दिली जात असली तरी, आता उत्तर प्रदेशच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनाही ही शिक्षा दिली जाणार आहे.
खरंतर कुत्र्यांना जन्मठेप हे जरा विचत्रच जरी वाटत असलं तरी कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांना नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता, प्रधान सचिव नगरविकास अमृत अभिजात यांनी राज्यातील सर्व नगरपालिका संस्थांना एक नवीन आदेश जारी केला आहे. यामध्ये, हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर या आदेशानुसार, जर कुत्रा पहिल्यांदा एखाद्याला चावला तर त्याला प्रथम दहा दिवसांची शिक्षा होईल आणि जर तो दुसऱ्यांदा चावला तर त्याला अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरमध्ये आयुष्यभर ठेवले जाणार आहे.
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कुत्र्याला जेव्हा एखादी व्यक्ती अधिकृतपणे दत्तक घेईल तेव्हाच सोडले जाईल. तथापि, हल्ला करणाऱ्या आणि हिंसक कुत्र्यांना शिक्षा करण्यासाठी जारी केलेल्या आदेशात काही अटी देखील घातल्या आहेत. यासाठी, कुत्रा चावलेल्या पीडित व्यक्तीस सरकारी रुग्णालयात उपचारांचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. एबीसी सेंटरमध्ये उपचारांसह कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेवले जाईल. दहा दिवसांनी एबीसी सेंटरमधून सोडण्यापूर्वी कुत्र्याच्या शरीरावर मायक्रोचिप बसवली जाईल. या मायक्रोचिपद्वारे कुत्र्याच्या वर्तनाचे निरीक्षण केले जाईल.
प्रयागराज महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आणि कल्याण अधिकारी डॉ. विजय अमृतराज यांच्या मते, नगरविकास विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, जर कुत्रा पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला चावला तर त्या कुत्र्याला दहा दिवसांची शिक्षा होईल. या काळात त्या कुत्र्याला अॅनिमल बर्थ कंट्रोल म्हणजेच एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाईल, परंतु जर तोच कुत्रा दुसऱ्यांदा एखाद्याला चावला तर तीन सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करेल. त्या कुत्र्याला पुन्हा एबीसी सेंटरमध्ये आयुष्यभरासाठी ठेवले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.