PM मोदी म्हणतात, यूपी+योगी म्हणजे खूपच 'उपयोगी'!

PM मोदी म्हणतात, यूपी+योगी म्हणजे खूपच 'उपयोगी'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज शनिवारी गंगा एक्स्प्रेसवेची (Ganga Expressway) पायाभरणी केली. हा एक्स्प्रेसवे 594 किलोमीटर लांबीचा आणि सहा लेनचा असेल. (Uttar Pradesh) या प्रोजेक्टसाठी 36,200 कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत. शाहजहांपूर रोजा रेल्वे ग्राऊंडवर आज पंतप्रधान मोदींनी बोलताना म्हटलंय की, हा एक्स्प्रेसवे शेतकरी आणि तरुणांसाठी एक वरदान म्हणून सिद्ध होईल. या दरम्यान विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी म्हटलं की, याआधी सायंकाळ होताच रस्त्यांवर बंदूका चालवल्या जात. मात्र, मुख्यमंत्री (CM Adityanath) आता अवैध गोष्टींवर बुलडोझर चालवत आहेत. (UP Election 2022)

PM मोदी म्हणतात, यूपी+योगी म्हणजे खूपच 'उपयोगी'!
फायझरचे घेतले तीन डोस; तरीही मुंबईतील व्यक्ती ओमिक्रॉन बाधित

याआधी व्यापारी जेंव्हा घरातून सकाळी निघायचा तेंव्हा कुटुंबाला चिंता वाटायची. एखादा गरीब परिवार दुसरड्या राज्यामध्ये कामासाठी जायचा तेंव्हा घर आणि जमीनीवर अवैध ताबा मिळवला जाईल, अशी भीती त्याला वाटायची. कुठे काय घडेल, याची काहीच शाश्वती नव्हती. गेल्या साडेचार वर्षांमध्ये योगींच्या सत्तेमध्ये सरकारने ही परिस्थिती सुधारण्यासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. यासाठीच यूपीची जनता आज म्हणतेय की, यूपी+योगी म्हणजेच खूपच उपयोगी आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा संपूर्ण उत्तर प्रदेश एकसंघ होतो, तेव्हा देशाची प्रगती होत असते. त्यामुळंच यूपीच्या विकासावर आमचं लक्ष असणार आहे. सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रानं आम्ही उत्तर प्रदेशच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पूर्वी शेतकऱ्यांना बँकांच्या दारात प्रवेश मिळत नव्हता. पण, आता शेतकऱ्यांच्या मालाची किंमत एमएसपीवर खरेदी केली जात असून पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाताहेत, असंही त्यांनी म्हटलंय.

PM मोदी म्हणतात, यूपी+योगी म्हणजे खूपच 'उपयोगी'!
Novavax: नोव्हावॅक्स लस 90 टक्के कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी

कसा असेल गंगा एक्स्प्रेस वे?

गंगा एक्स्प्रेस वे हा उत्तर प्रदेशातील सर्वात लांब मार्ग असल्याचं म्हटलं जातंय. त्याची लांबी 594 किमी असून गंगा एक्स्प्रेस वे मेरठ (Meerut) ते प्रयागराजपर्यंत (Prayagraj) उत्तर प्रदेशातील 12 जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार आहे. हा एक्स्प्रेस वे यूपीच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडला जाईल, तर एक्सप्रेस वे मेरठ-बुलंदशहर रस्त्यावर (NH-334) मेरठच्या बिजौली गावातून सुरू होईल आणि प्रयागराज बायपास (NH-19) करुन जुडापूर दांदू गावाजवळ संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज शाहजहांपूरमध्ये 36,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 594 किमी लांबीच्या गंगा एक्सप्रेस वे'ची पायाभरणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com