सहारनपूर : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोन भावांसह चार जण ठार, अनेक जण बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Explosion in Saharanpur Firecracker Factory

फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीमुळं सहारनपूर गाव हादरलंय.

सहारनपूर : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; दोन भावांसह चार जण ठार

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये (Saharanpur, Uttar Pradesh) आज (शनिवार) सायंकाळी फटाक्यांच्या कारखान्याला (Fireworks Factory) लागलेल्या आगीमुळं सहारनपूर गाव हादरलंय. या दुर्घटनेत एका अल्पवयीनासह चार जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर कारखान्यातील अनेक कामगार अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये दोन चुलत भावांचाही समावेश आहे. या भीषण स्फोटात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झालीय. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या (Fire Brigade) आणि पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ते मदतकार्यात गुंतले आहेत.

अंबाला रोडवरील सोरोना बलबंतपूर गावच्या जंगलात ही दुर्घटना घडलीय. किरण फायर वर्क्स (Kiran Fireworks) या नावानं हा फटाक्यांचा कारखाना चालत होता. कारखान्याचा मालक जोनी हा सरसावा परिसरातील सलेमपूर गावचा रहिवासी आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आजूबाजूच्या गावातील अनेक लोक कारखान्यात काम करत असताना अचानक कारखान्यात स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळं आजूबाजूच्या चार-पाच गावांतील लोक घाबरले. परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, कारखान्यात झालेल्या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीय.

हेही वाचा: कर्नाटकात काँग्रेसला मोठा झटका; माजी कॅबिनेट मंत्र्यानं सोडला पक्षाचा 'हात'

या स्फोटात कार्तिक सैनी (17) मुलगा योगेंद्र सैनी आणि त्याचा चुलत भाऊ सागर (22), मुलगा राजेश रा. बळवंतपूर यांच्यासह दोन अनोळखी लोकांचा मृत्यू झालाय. एसएसपी आकाश तोमर यांनी सांगितलं की, सोरोनाच्या जंगलात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळं चार जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असून ही आग कशी लागली, हे अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी नमूद केलंय.

Web Title: Uttar Pradesh Explosion In Saharanpur Firecracker Factory Four Including Two Cousins Killed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradesh
go to top