Uttar Pradesh reels under severe floods : उत्तर प्रदेशमध्ये सध्या पावसाचा हाहाकार सुरु आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यातील १६ जिल्ह्यांमध्ये गंगा आणि यमुना या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे प्रयागराज, वाराणसी, बलिया, चंदौली, मिर्झापूर, जालौन, आग्रा, कानपूर नगर, कानपूर देहात, हमीरपूर, बांदा, इटावा, औरैया, फतेहपूर आणि चित्रकूट अशा जिल्ह्यांमधल्या गंगा-यमुना नदीचं पाणी गावांत पाणी शिरलं आहे.