CM Yogi Adityanath inaugurates the high-tech forensic lab in Gorakhpur
Sakal
देश
Yogi Adityanath : पोलिसांसाठी 'गेम चेंजर' तर गुन्हेगारांसाठी धोक्याची घंटा; योगींनी साकारली 'हायटेक फॉरेंसिक लॅब'
UP Forensic Lab : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांनंतर (ज्यात ७ वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी फॉरेंसिक तपासणी अनिवार्य केली आहे), लॅब्सची उपयोगिता वाढली आहे. लॅब्समुळे तरुणांसाठी रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील.
Gorakhpur : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले आहे की, २०१७ नंतरचा नवीन उत्तर प्रदेश (UP) कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारी स्वीकारणार नाही. जर कोणी येथे गुन्हा करण्याचे धाडस केले, तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल. पीडित त्रस्त राहायचा आणि गुन्हेगार मजा करायचे, तो काळ आता संपला आहे! मंगळवारी (१७ नोव्हेंबर) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुर येथील क्षेत्रीय विधि विज्ञान प्रयोगशाळेच्या (RFSL) इमारतीचे लोकार्पण केले. 'बी' क्लासमधून 'ए' क्लासमध्ये रूपांतरित झालेल्या या सहा मजली, हायटेक इमारतीच्या बांधकामावर ₹७२.७८ कोटी खर्च आला आहे.

