UP I यूपीत रुग्णवाहिका सेवेत मोठा घोटाळा, बनावट रुग्णांना दाखवून लूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

up 102 ambulance fake patients

याप्रकरणी महासंचालक व कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

यूपीत रुग्णवाहिका सेवेत मोठा घोटाळा, बनावट रुग्णांना दाखवून लूट

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरासह राज्यातील काही भागातून आरोग्यासंदर्भात एक घोटाळा समोर आला आहे. गर्भवती महिला आणि बालकांसाठी मोफत सुविधा पुरवणाऱ्या 102 रुग्णवाहिकेच्या सेवेसंदर्भात घोटाळा समोर आला आहे. रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी कार्यरत असली तरीही राज्यातील काही भागात रुग्णांशिवाय रुग्णवाहिका चालवत असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महासंचालक व कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. (up 102 ambulance fake patients)

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊसह उत्तर प्रदेशात गर्भवती महिलांसाठी रुग्णालय ते घर आणि घर ते रुग्णालयात अशी 102 रुग्णवाहिका सेवा दिली जाते. मात्र रुग्णांसाठी धावण्याच्या नावाखाली खोटी बिले तयार करून सरकारकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप होत आहे.

हेही वाचा: केरळमधील सीपीआय मुख्यालयावर बॉम्ब हल्ला

यासंदर्भात काही व्हिडीओ आणि फोन रेकॉर्डिंगमधून समोर आले आहे की, रुग्णवाहिकेतून रुग्णाऐवजी इतर खोटे रुग्ण घेऊन जाण्यासाठी कंपनी चालकांवर दबाव टाकला जात आहे. तसेच चालकाला नोकरीवरून काढण्याची धमकीही दिली जातेय. दरम्यान, एका तरुणाला कामावरून कमी केल्याने त्याने आत्महत्याही केली असल्याची धक्कादायक माहितीही समोर येत आहे.

कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, यूपीतील काही प्रकरणे याच्याशी संबंधित असून चौकशी करण्यासाठी डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने सांगितल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व आरोग्य विभागांना पत्रे पाठवली असून प्रकरणाची चौकशी सुरु आहेत. याप्रकरणी दोषी आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: मायावतींनंतर JDS चे कुमारस्वामी देणार भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा!

यासंदर्भात एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू असून हे कसे घडले याचे अहवाल प्रत्येक जिल्ह्यांतून मागवले जात आहेत. यादरम्यान, सखोल चौकशीनंतर जो कोणी सहभागी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

रुग्णवाहिका संघटनेचे उपाध्यक्षांनी सांगितलेली माहिती अशी की, रुग्णवाहिका चालकांचा सतत छळ होत आहे. जास्त फेऱ्या न घेतल्यास नोकरीतून काढून टाकले जाण्याचे आदेश कंपनीने दिले आहेत. त्यामुळे चालकांना अधिकच्या फेऱ्या माराव्या लागतात. अनेक चालकांना याचा मानसिक त्रास होत असून सरकारने कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

हेही वाचा: पंजाब विधानसभेत 'अग्निपथ' योजनेविरोधात ठराव मंजूर

Web Title: Uttar Pradesh Fraud In 102 Ambulance Fake Patients Transport From Ambulance In State

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..