esakal | लव्ह जिहादविरोधात योगी सरकारचा मोठा निर्णय; कायदा होणारच!
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

 उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने लव्ह जिहाद विरोधातील अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. 

लव्ह जिहादविरोधात योगी सरकारचा मोठा निर्णय; कायदा होणारच!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाने लव्ह जिहाद विरोधातील अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. याआधी उत्तर प्रदेश सरकारने लव्ह जिहादवर कायदा करणार असल्याची घोषणा केली होती. आमिष दाखवून, दबाव टाकून लग्नाच्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. 

योगी सरकारमधील मंत्री मोहसीन रजा यांनी सांगितलं होतं की, उत्तर प्रदेशात आता लव्ह जिहाद चालणार नाही. मिशनच्या माध्यमातून मुलींना फूस लावून धर्मांतर करू देणार नाही. कायदा तयार करून जिहादींना हा संदेश आहे जो लग्नाच्या आडून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत आहे. अशा लोकांना आता तुरुंगात डांबण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 

लव्ह जिहाद विरोधात कायदा तयार करण्याबाबत सर्वात आधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील एका प्रचार दौऱ्यावेळी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या एका निर्णय़ामध्ये स्पष्ट केलं आहे की, फक्त लग्न करण्यासाठी धर्मांतर करणं बेकायदेशीर असेल.

हे वाचा - राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश सरकार याबाबत कठोर कायदा आणेल आणि असे प्रकार करणाऱ्यांना धडा शिकवेल अंस म्हटलं होतं. त्यांच्या या घोषणेनवंतर भाजपशासित राज्यांमध्येसुद्धा लव्ह जिहादच्या विरोधात कायदा बनवण्यासाठी आवाज उठवला जात आहे. 

मध्य प्रदेशातही लव्ह जिहादवरून बिल सादर करण्याची चर्चा झाली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं की, पुढच्या विधानसभेच्या अधिवेशानत लव्ह जिहादबाबत विधेयक मांडलं जाणार आहे. लव्ह जिहाद झाल्यास 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा असेल.