उत्तर प्रदेशात आता 'गो पर्यटन'

वृत्तसंस्था
रविवार, 8 डिसेंबर 2019

- भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने "गो पर्यटन' सुरू करण्याचा घेतला निर्णय. 

लखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने "गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा भटक्‍या जनावरांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी मोठा फायदा होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे पशू आणि पालकमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

या विषयी बोलताना चौधरी म्हणाले, ""योगी अदित्यनाथ यांचे सरकार गोरक्षणासाठी सतर्क असून, त्यांचे रक्षण करणे आणि पालन करणे हे कर्तव्य समजते. याकरिता आम्ही बाराबांकी आणि महाराजगंजसारख्या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर "गो पर्यटन' सुरू करणार आहोत. त्यासाठी आम्ही या भागांमधील एखाद्या मोठ्या शेतात उभारलेल्या केंद्रात 15 हजार ते 25 हजार गोवंश एकत्रित आणत या पर्यटनाचा प्रयोग सुरू करणार आहोत. तसेच या शेतांमध्ये गायींच्या शेणापासून "बायो गॅस' प्रकल्प उभा करण्याचा आमचा विचार असून, त्याद्वारे अशा प्रकल्पांना व्यवहार्य करायचा आमचा उद्देश आहे. 

पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना; विमानतळावर भुजबळांची उपस्थिती

त्याचबरोबर एकाच ठिकाणी इतक्‍या मोठ्या प्रमाणात गायी आणल्यास त्यांच्या देखरेखीसाठी चांगल्या सुविधा निर्माण करता येऊ शकतील. तसेच ज्याप्रमाणे लोक इतर प्राण्यांना पाहण्यासाठी जंगल पर्यटन करतात, त्याप्रमाणेच लोक या गाईंना पाहण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ शकतात. यासाठी आलेल्या पर्यटकांची व्यवस्था आम्ही करू शकतो, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttar Pradesh govt plans cow safaris for better upkeep of bovines