

HIV Cases in Uttar Pradesh
sakal
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात सध्या सुमारे १ लाख ७४ हजार नागरिक एचआयव्ही संसर्गासह जीवन जगत आहेत. यामध्ये राज्यातील विविध कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या ५८७ कैद्यांचाही समावेश आहे. कारागृहांमधील आकडेवारीनुसार, मथुरा येथे सर्वाधिक ४८ कैदी एचआयव्ही बाधित असल्याची नोंद आहे. त्यानंतर सहारनपूरमध्ये ४२, तर मुरादाबाद आणि गौतम बुद्ध नगर येथे प्रत्येकी ४१ बाधित कैदी आहेत.
देशभरात सुमारे २५.६१ लाख नागरिक एचआयव्हीसोबत जीवन जगत असल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एचआयव्हीचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ‘मिशन एड्स सुरक्षा’ अंतर्गत १ डिसेंबर २०२७ पर्यंत एचआयव्ही महामारीवर नियंत्रण मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.