Mukhtar Ansari
Mukhtar AnsariEsakal

Mukhtar Ansari Dies: तुरुंगात असलेला गँगस्टर मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू!

छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.
Published on

लखनऊ : तुरुंगात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर आणि राजकीय नेता मुख्तार अन्सारी याचा तीव्र हृदविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छातीत अत्यंत वेदना होऊ लागल्यानं तातडीनं त्याला बांदा इथल्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याची प्राणज्योत मालवली. समाजवादी पार्टीनं ट्विट करत अन्सारीच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे.

अन्सारीच्या घराबाहेर मोठी गर्दी

मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच त्याच्या गाझीपूर इथल्या निवासस्थानाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. या बातमीमुळं कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून ज्या रुग्णालयात सध्या त्याचं पार्थीव ठेवण्यात आलं आहे, त्या बांदा मेडिकल कॉलेजबाहेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. (Marathi Tajya Batmya)

Mukhtar Ansari
Rashmi Barve: काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचा अर्ज अखेर बाद! आता 'हा' असणार रामटेकचा अधिकृत उमेदवार

कोण हाता मुख्तार अन्सारी?

  1. मुख्तार अन्सारी हा समाजवादी पार्टीकडून पाच वेळा आमदार राहिला होता.

  2. त्याच्यावर ६१ हत्येचे, खंडणीचे आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल होते.

  3. कॉन्ट्रॅक्टर सच्चिदानंद राय यांच्या हत्येचा गुन्हा अन्सारीवर होता.

  4. त्याचबरोबर काँग्रेस नेते अवधेश राय यांची त्यानं काशी इथं हत्या केली होती.

  5. भाजपचा आमदार कृष्णानंद राय यांच्यावर अन्सारी यानं २१ गोळ्या झाडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com