लखनौ (उत्तर प्रदेश) : एका कॉन्स्टेबलच्या पत्नीने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक (Constable Wife Case) घटना समोर आली आहे. सौम्या कश्यप असं या महिलेचं नाव आहे. तिनं आत्महत्या करण्यापूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिनं सासरच्या लोकांकडून झालेल्या अत्याचारांचा पर्दाफाश केला.