esakal | अखेर ६४ वर्षानंतर रेल्वेच्या नकाशावर आले 'बनारस' स्टेशन
sakal

बोलून बातमी शोधा

Banaras Railway Station

अखेर ६४ वर्षानंतर रेल्वेच्या नकाशावर आले 'बनारस' स्टेशन

sakal_logo
By
नरेश शेंडे

वाराणसी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लोकसभा क्षेत्रातील मंडुआदी रेल्वे स्थानकाचे (Manduadih Railway Station) नाव तब्बल ६४ वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. मंडुआदी रेल्वे स्थानकाचे नवीन नाव 'बनारस' (Banaras) असे ठेवण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाकडून (Railway Board) नवीन नाव देण्याच्या प्रस्तावाला होकार मिळाला. त्यानंतर बुधवारी उत्तर- पूर्व रेल्वे प्रशासनाने (NER) पूर्वीचा मंडुआदी नाव असलेला फलक काढून त्याजागी बनारस नावाचा नवीन फलक (New Railway Board) लावला आहे. ( Uttar pradesh Manduadih Railway Station renamed as Banaras after sixty four years finally-nss91 )

''रेल्वे बोर्डाने मंडुआदी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून बनारस ठेवण्यासाठी बुधवारी अंतरीम मंजुरी दिली. त्यानंतर नामफलक बदलण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. बनारस रेल्वे स्थानकाचे आता 'बीएसबीएस' असे नवीन कोड असणार आहे. तसेच नवीन नामफलकावर रेल्वे स्थानकाचे नाव हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या भाषांमध्ये असणार आहे." अशी माहिती उत्तर-पूर्व रेल्वेचे वाराणसी विभागीय व्यवस्थापक विजय कुमार पंजिर यांनी दिली आहे.

हेही वाचा: 'शतकांपासूनची व्यवस्था मोदी सरकारमुळे उद्ध्वस्त'; राहुल गांधींचा घणाघात

"राज्याचे माजी रेल्वे मंत्री आणि जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट राज्यपाल मनोज सिन्हा यांनी २०१९ मध्ये या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या प्रकियेला सुरुवात केली होती. त्यानंतर २०१९ च्या अखेरीस योगी आदीत्यनाथ सरकारने हा प्रस्ताव स्विकारला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी गृहखात्याला याबाबत माहिती देण्यात आली. १६ सप्टेंबर २०२० मध्ये राज्यापालांनी औपचारीकपणे मंडुआदी रेल्वे स्थानकाचे नामकरण बनारस असे केले. त्यांना ३१ मार्च २०२०ला याबाबत नाहरकत दाखला देण्यात आला होता." अशी माहिती उत्तर- पूर्व विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तब्बल ६४ वर्षांच्या अंतरानंतर भारतीय रेल्वेच्या नकाशात बनारस रेल्वे स्थानक अशी नोंद झाली आहे. तर इतिहास प्राध्यापक राणा पी बी सिंग रेल्वे स्थानकाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणालेत " वाराणसी रेल्वे स्थानक 'बनारस कॅंट' या नावाने ओळखलं जायचं. जेव्हा डॅा संपूर्णानन्द उत्तप प्रदेशचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी बनारस जिल्ह्याचे नामकरण वाराणसी असे केले. एवढेच नाही तर २४ मे १९५६ ला 'बनारस कॅंट' रेल्वे स्थानकाचे 'वाराणसी जंक्शन' असेही नामांतर केले.

loading image