esakal | 'शतकांपासूनची व्यवस्था मोदी सरकारमुळे उद्ध्वस्त'; राहुल गांधींचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader rahul gandhi statement against pm modi over caa and nrc

'शतकांपासूनची व्यवस्था मोदी सरकारमुळे उद्ध्वस्त'; राहुल गांधींचा घणाघात

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलंय की, गेल्या अनेक शतकांपासून बनवलेली व्यवस्था काही क्षणांतच उद्ध्वस्त केली गेली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलंय की, अनेक शतकांपासून बनवलेली व्यवस्था क्षणांतच उद्ध्वस्त केली आहे. देशाला व्यवस्थित माहितीय की, हा कठिण काळ कुणी आणला आहे.

हेही वाचा: SSC Result 2021: मोठी बातमी, दहावीचा निकाल उद्या

या ट्विटसोबत त्यांनी #VaccineShortage #LAC #Unemployment #PriceHike #PSU #Farmers #OnlyPR असे अनेक हॅश्टॅग देखील जोडले आहेत. या ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी लशीचा तुटवडा, सीमावाद महागाई, बेरोजगारी यांसारख्या अनेक मुद्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याआधी बुधवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटलं होतं की, परराष्ट्र व संरक्षण धोरणामध्ये राजकीय चालबाजी करून मोदी सरकारने आपला देश कमकुवत केला आहे. भारत इतका असुरक्षित कधीच नव्हता.

loading image