Moradabad Case
esakal
लखनौ : मुरादाबाद शहरातील कटघर परिसरातील छोटा छता भागात मंगळवारी रात्री झालेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला (Moradabad Case) आहे. बारावीचा विद्यार्थी ठाकूर विनायक सिंग (वय 17) याची शेजाऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केली. घरासमोर शिवीगाळ केल्याचा विरोध केल्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत विनायक सिंग हा भाजपचे (BJP) माजी प्रादेशिक मीडिया प्रभारी अनुराग सिंग यांचा पुतण्या आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू असून, काहींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.