
उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरातील लखपेडाबाग येथील सरस्वती विद्या मंदिर इंटर कॉलेजची ११ वीची विद्यार्थिनी अचानक वर्गात बेशुद्ध पडली. शाळा प्रशासनाने कोणताही विलंब न करता तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला रुग्णालयात मृत घोषित केले. कॉलेजमध्ये तिच्या मैत्रिणींशी बोलत असलेल्या मुलीच्या नाकातून अचानक रक्त येऊ लागले आणि ती रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.