
Bijnor Bus Accident
ESakal
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका वेड्या तरुणाने प्रवाशांनी भरलेली रोडवेज बस सुरू केली. त्यानंतर रस्त्यावरून चालवली. हा वेडा माणूस सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रस्त्यावर बस चालवत राहिला. यादरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर अनियंत्रित बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. या घटनेत काही लोक जखमीही झाले. पोलिसांनी वेड्या तरुणाला अटक केली आहे. निष्काळजीपणाबद्दल बस चालकावर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.