
Youth preparing for UP Home Guard recruitment physical test as government announces 44,000 vacancies.
Sakal
लखनौ: उत्तर प्रदेशात होमगार्डच्या जवळपास ४४ हजार रिक्त जागांवर लवकरच भरती होणार आहे. या पदांसाठी आता १२ वी पास तरुण-तरुणी अर्ज करू शकणार आहेत. यापूर्वी होमगार्डसाठी दहावी पासची अट होती, ती बदलून आता १२ वी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नुकतीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी होमगार्ड संघटनेचा आढावा घेतला, ज्यात भरती प्रक्रियेसाठी ‘नोंदणी मंडळ’ (Enrolment Board) स्थापन करण्याबद्दल काही महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्यात आले.