UP Election
sakal
देश
UP Election: स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी ग्रामपंचायतींना बंपर दिवाळी गिफ्ट; 'या' जिल्ह्यांच्या खात्यात जमा झाले कोट्यवधी रुपये
Uttar Pradesh panchayat fund: उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण त्यापूर्वीच होणाऱ्या पंचायत निवडणुकीला या मोठ्या निवडणुकीचा उपांत्य सामना मानले जात आहे.
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पण त्यापूर्वीच होणाऱ्या पंचायत निवडणुकीला या मोठ्या निवडणुकीचा उपांत्य सामना मानले जात आहे. अशा राजकीय वातावरणात, राज्य सरकारने ग्रामपंचायतींना मोठी भेट दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, १५.४८ अब्ज रुपये (सुमारे १५४८ कोटी रुपये) रकमेचा पहिला हप्ता जारी केला आहे.