
लखनौ : ‘अतिक अहमदसारख्या गुंडाला धुळीला मिळविल्याबद्दल’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विधानसभेत स्तुती केल्याबद्दल समाजवादी पक्षाच्या आमदार पूजा पाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.