Punjab : 4 आमदारांची तिकिटे कापली,बॉलिवूड स्टारच्या बहिणीला संधी

मुख्यमंत्री साहिब, सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून लढणार
navjot singh sidhu
navjot singh sidhuSakal

पंजाब : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसने (Congress) उत्तर प्रदेशातील 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली असून, पंजाब मधील 86 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर 4 आमदारांची तिकिटे कापण्यात आली आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे आपच्या यादीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

navjot singh sidhu
Army Day : सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला भारत-पाक सिमेवर

दरम्यान, मोगा विधानसभा मतदारसंघातून बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहीण मालविका सूद यांना पक्षाने तिकीट दिल्याने नाराज झालेले काँग्रेस आमदार हरजोत कमल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मालविकाचे तिकीट जाहीर झाल्यानंतर दोन तासांनी हरजोत कमल यांनी चंदीगडमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

या 4 आमदारांची कापली तिकिटे

  • मोगा मतदारसंघातून आमदार हरजोत कमल यांच्या जागी बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहीण मालविका सूद यांना तिकीट देण्यात आले आहे.

  • रुपिंदर कौर रुबी यांना मलोतचे विद्यमान आमदार आणि पंजाब विधानसभेचे उपसभापती अजयब सिंग भाटी यांच्या जागी तिकीट देण्यात आले आहे. रुबी याआधी आम -आदमी पक्षाच्या तिकीटावर भटिंडा ग्रामीणमधून आमदार होत्या त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • हरगोबिंदपूर येथील बलविंदर लाडी यांचे तिकीट रद्द करण्यात आले. लाडी यांच्या जागी मनदीप सिंग रंगड नांगल यांना तिकीट देण्यात आले आहे. लाडी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र सहा दिवसांनंतरच ते काँग्रेसमध्ये परतले.

  • बल्लुआनाचे आमदार नथुराम यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी राजिंदर कौर यांना तिकीट देण्यात आले आहे.

  • पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान, १० मार्चला निकाल

    पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 21 जानेवारीला जारी होणार आहे. २८ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करता येईल २९ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ३१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

काँग्रेसने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi)यांना चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu)अमृतसर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सीएम चेन्नई आणि सिद्धू यांच्याशिवाय प्रतापसिंग बाजवा यांना कादियान मतदारसंघातून, सुखजिंदर सिंग रंधवा यांना डेरा बाबा नानक मधून आणि हरिंदर पाल सिंग मान यांना सनोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com