पंजाबचे CM चन्नी PM मोदींना म्हणाले ‘तुम्ही कयामतपर्यंत जगा’

चरणजितसिंग चन्नी
चरणजितसिंग चन्नीsakal

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (Narendra Modi) गुरुवारी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आणि ‘तुम्ही कयामतपर्यंत जगा’ असे म्हटले. देशातील कोरोना प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक (Chief Ministers meeting) घेतली होती. यावेळी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ५ जानेवारीला नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीबद्दल दु:खही व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नरेंद्र मोदी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये सुमारे ४३,००० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनासाठी आले होते. मात्र, त्यांचा ताफा उड्डाणपुलावरच अडकला होता. त्यानंतर त्याला परत जावे लागले होते. तेव्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘मी जिवंत पोहोचलो’ असे तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा असे म्हटले होते. यामुळेच चन्नी यांनी ‘तुम्ही कयामतपर्यंत जगा’ असे म्हटले.

चरणजितसिंग चन्नी
नागपुरात रेकॉर्ड; नीरीतील तपासणीत आढळले ७३ ओमिक्रॉनबाधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होशियारपूर आणि कपूरथळा येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करणार होते. याशिवाय ते फिरोजपूर, पीजीआय चंदीगड येथील उपग्रह केंद्राचे उद्घाटन करणार होते. मात्र, ताफ्यात अडकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भटिंडा विमानतळावर परतले आणि थेट दिल्लीला गेले. एवढेच नाही तर परतीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंजाब सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला सांगितले होते.

वक्तव्यावर पंजाब सरकारने घेतला आक्षेप

भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो, असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर पंजाब (Punjab) सरकारने आक्षेप घेतला होता. तसेच पंजाबची बदनामी करणारे वक्तव्य असल्याचे म्हटले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले. या घटनेच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com