आज एक्स्प्रेस वे वर उतरणार फायटर जेट्स, मोदी स्वत: येणार C-130 जे सुपर हरक्युल्समधून | EXpress way | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज एक्स्प्रेस वे वर फायटर जेट्सच लँडिंग, मोदी येणार C-130 J मधून

आज एक्स्प्रेस वे वर फायटर जेट्सच लँडिंग, मोदी येणार C-130 J मधून

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांच्याहस्ते आज उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेस वे (Purvanchal Expressway) चे उद्घाटन होणार आहे. ३४० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या पूर्वांचल एक्स्प्रेस वे च्या उद्घाटनाप्रसंगी खास एअर शो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: एअरफोर्सच्या C-130 जे सुपर हरक्युल्स विमानामधून येणार आहेत. आज होणाऱ्या उद्घटनाच्यावेळी एक्प्रेस वे वर फायटर विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग होणार आहे.

एअर शो मध्ये फायटर विमानं थरारक प्रात्यक्षिकही सादर करतील. या एअर शो पूर्वी एअर फोर्सने रंगीत तालिमही केली आहे. एक्स्प्रेस वे वर विमानांच्या लँडिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राजधानी लखनऊपासून १०० किमी अंतरावर हा एक्स्प्रेस वे आहे. मिराज २०००, एएन-३२, सुखोई-३० ही फायटर विमान आज एक्स्प्रेस वे वर लँडिंग करतील.

हेही वाचा: Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश | Madhya Pradesh

पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन येणारे C-130 जे सुपर हरक्युल्सने सुल्तानपूर जिल्ह्यातील सिमेंटच्या धावपट्टीवर लँडिंगचा सराव केला. इमर्जन्सीच्यावेळी एअर फोर्सच्या जेटच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी ही धावपट्टी बनवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १.३० वाजता आगमन होईल व ते सभेसाठी जातील. त्यानंतर पंतप्रधानांसमोर एअर शो सादर होईल. देशात आता बांधण्यात येत असलेल्या काही एक्स्प्रेस वे व एअर फोर्सला इमर्जन्सीमध्ये वापरण्यासाठी धावपट्टी बनवण्यात येत आहे. ही संकल्पना मूळची दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी जर्मनीची आहे.

loading image
go to top