Amazon वरुन 1 टन गांजाची तस्करी; कढीपत्त्याच्या नावाने ऑनलाईन ड्रग्ज विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amazon

Amazon वरुन गांजाची तस्करी; टोळीचा पर्दाफाश | Madhya Pradesh

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

मध्य प्रदेश : ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेली Amazon कंपनीद्वारे चक्क गांजाच्या तस्करी करण्यात आली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशात उघडकीस आला आहे. डिजिटलायझेशनचा गुन्हेगार अशा पद्धतीनेही गैरवापरही करत असल्याचे वारंवार समोर येत आहे

कढीपत्त्याच्या नावाने गांजा विक्री

कल्लूने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा. कल्लूने आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला, अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली.

हेही वाचा: जम्मू काश्मीर: दोन दहशतवाद्यांसह तिघे ठार

आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त

दरम्यान, आरोपी एका आघाडीच्या ई-कॉमर्स कंपनीच्या माध्यमातून त्यांची टोळी चालवत होते आणि या कंपनीला दोन तृतीयांश नफाही मिळत होता. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ई-कॉमर्स कंपनीवर अशा अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते का, याबाबत तपास सुरु असल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाइन गांजा विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे. भिंडचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली. आरोपींकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ऑस्ट्रेलिया: भारताने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड

दोन आरोपींना अटक

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. डिजिटलायझेशनच्या काळात व्यवहार आणि जीवनपद्धती जितकी सोपी झाली आहे, तितकेच त्याचे गैरवापरही होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सरकार जितके कायदे कडक करीत आहेत तितकंच गुन्हेगारही गुन्हे करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधत आहेत. असाच

loading image
go to top