UP Rural Tourism: किल्ल्यापासून आंब्यांपर्यंत! आता परदेशी पर्यटकही पाहणार यूपीची गावे; सरकारकडून ग्रामीण पर्यटनाला बूस्ट
Uttar Pradesh: किल्ले, आंब्यांच्या बागा आणि गावसंस्कृती अनुभवण्यासाठी यूपी सरकार ग्रामीण पर्यटनाला चालना देत आहे. परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश ग्रामीण पर्यटन सर्किट विकसित करण्यात येत आहे.
योगी सरकारने ग्रामीण पर्यटनाला (Rural Tourism) चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. गावांचे सौंदर्य जगासमोर आणून ग्रामीण पर्यटन वाढवण्यासाठी धोरणात्मक चौकट तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे.