
उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या सरकारचं कौतुक करणं महिला आमदाराला महागात पडलंय. समाजवादी पार्टीने आमदार पूजा पाल यांची पक्षातून हकालपट्टी केलीय. पूजा पाल यांचे पती राजू पाल यांची अतिक अहमदच्या गँगने हत्या केली होती. प्रयागराजमध्ये घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील अतिक अहमदसह त्याच्या गँगचा युपी पोलिसांनी सुपडा साफ केलाय. याबद्दल पूजा पाल यांनी विधानसभेत भरअधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं आभार मानलं होतं.