Illegal Mosque Demolition in Sambhal
esakal
संभल जिल्ह्यात तलावावर बांधलेली बेकायदेशीर मशीद बुलडोझरने पाडण्यात आली.
कारवाईदरम्यान पोलिस व निमलष्करी दलाची मोठी तैनाती करण्यात आली.
स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
Illegal Mosque Demolition in Sambhal : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रायबुजुर्ग गावात पोलिसांनी (UP Police) मोठी कारवाई करत तलावाच्या जागेवर बांधलेली बेकायदेशीर मशीद पाडली. ही कारवाई बुधवारी सकाळी करण्यात आली. मशीद पाडण्यापूर्वी गावात लाऊडस्पीकरद्वारे घोषणा करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिस आणि निमलष्करी दल मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.