CM Yogi Adityanath
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. लखनौमध्ये आयोजित ‘एआय इन ट्रान्सफॉर्मिंग हेल्थकेअर’ या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उत्तर प्रदेशच्या 'एआय मिशन'ची घोषणा केली.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे प्रशासनाला केवळ प्रतिसाद देणारे न ठेवता, अधिक तत्पर आणि भविष्यवेधी (Proactive) बनवणारे प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.